चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-2’मोहिमेचे “विक्रम’ लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे अगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. चंद्राच्या केवळ २.१ किमी दूर असताना विक्रम लॅंडरचा संपर्क तुटल्याने शास्त्रज्ञ डेटा विश्लेषण करत आहेत.

पण इस्रोच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही हा प्रवास थोडा मोठा झाला आहे, पण येत्या काळात नक्कीच यशस्वी होईल, असे म्हणत इस्रोच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या कि, आम्ही इस्त्रो आणि त्याच्याशी सर्व सदस्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे भारताने अवकाशातील जगतातील अग्रगण्य देशांच्या यादीत स्थान निर्माण केले आणि पुढील पिढ्यांना तारे गाठण्यासाठी प्रेरणा दिली. ही आमच्या वैज्ञानिकांची उल्लेखनीय क्षमता, प्रसिद्धी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान असल्याचा पुरावा आहे.

चांद्रयान-२चा प्रवास थोडा मोठा झाला आहे, परंतु, अपयशातूनही आशा जन्माला आली असल्याची अनेक उदाहरणे इस्रोचा इतिहासात आहे. त्यांनी कधीही हार मानली नाही. आज आपण पोहोचलो नसलो तरी आपण तिथे पोहोचू यात मला शंका नाही. आज नाही उद्या नक्कीच पोहोचू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Find out more: